स्वतःला वाचविण्यासाठी परमबीरसिंग यांचे खोटे आरोप !

0
20210321_104016

स्वतःला वाचविण्यासाठी परमबीरसिंग यांचे खोटे आरोप !

परमविरसिंह इतके दिवस गप्प का होते ?

मुंबई, दि. 21 मार्च:
परमबीरसिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी ते सिद्ध करावेत. स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीरसिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? असा सवाल करत परमविरसिंह यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री देशमुख पुढे म्हणतात की,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
१७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीरसिंग यांनी १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून लक्षात येईल. परमबीरसिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे 18 मार्च रोजी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये
म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.

स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.
मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, असेही गृहमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *