सचिन वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे !
सचिन वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे !
मुंबई, दि. 9 मार्च:
विधानसभेत आज मनसुख हिरेन प्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेत मविआ सरकारला चांगलाचे अडचणीत आणले. सचिन वाझे यांच्याकडे ते वाहन ४ महिने होते. तिन्ही दिवस मनसुख हिरेन चौकशी सचिन वाझे यांनीच केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र त्यांनीच हिरेन यांच्याकडून तयार करून घेतले. त्यांना अटक होण्याचा सल्ला सचिन वाझे यांनीच दिला. २/३ दिवसात बाहेर काढण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनीच दिले. त्यांचा खून वाझे यांनीच केला असल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने FIR मध्ये व्यक्त केला आहे. सचिन वाझे यांना कोण आणि कशासाठी वाचविते आहे?
सचिन वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस म्हणाले की, सचिन वाझे आणि गावडे यांची पार्टी कोणती? त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही देत आहात! गुन्हेगाराचा पक्ष नसतो. त्यांना निलंबित केलेच पाहिजे! महाराष्ट्राच्या हितासाठी मी माहिती गोळा करेनच, माझी काय चौकशी करायची असेल ती करा! आता महाराष्ट्रात आत्महत्येचे पर्यटन करता आहात का? काय सांगताना तुम्हाला भूषणावह वाटते?
मुख्यमंत्री कुठे आहेत? ते का नाही उत्तर देत? असा प्रश्नांचा भडीमार करून सरकारला कोंडीत पकडले.
सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकं लोक अडचणीत येऊ शकतात, अनेक नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो तेव्हा गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना बाजूला करण्याचं कबूल केलं. पण मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय ते त्यावरुन हे बदलले मात्र सचिन वाझेला यांना दूर करणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे की सरकार त्यांना पाठीशी घालतंय आणि ते शोधण्याची गरज आहे., अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच, सचिन वाझेंना पकडलं तर ते कोणाकोणाची नावं सांगेल या भीतीने हे सरकार त्याला पाठीशी घालतंय, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
