तिजोरीत नाही आणा आणि मविआ सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा!

0
IMG-20181227-WA0052

तिजोरीत नाही आणा आणि मविआ सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा!

मुंबई, दि. ८ मार्च:
अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बाराबलूतेदारांसह अडचणीत साडपलेल्‍या सर्वच समाज घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्‍प असून, ‘तीजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा’ अशीच परिस्थिती आता निर्माण झाल्‍याची खोचक प्रतिक्रीया आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

अर्थसंकल्‍प जाहीर झाल्‍यानंतर आ.विखे पाटील यांनी सरकारने केलेल्‍या विविध घोषणांवर नाराजी व्‍यक्‍त केली. या सरकारने राज्‍यातील शेतक-यांसाठी जाहीर केलेल्‍या कर्जमाफी योजनेची कोणतीही पुर्तता केलेली नाही. दोन लाख रुपये कर्ज असलेल्‍या शेतक-यांना प्रोत्‍साहनपर अनुदान सरकार देणार होते, परंतू त्‍याचा शब्‍दही अर्थसंकल्‍पात कुठेही नाही. ३ लाख रुपयांवरील कर्जाच्‍या व्‍याजाच्‍या रक्‍कमेबाबतही सरकार काही बोलत नाही, त्‍यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी योजना ही फसवी ठरली असल्‍याचे आता स्‍पष्‍ट होते. राज्‍यात शेतक-यांना मोठ्या प्रमाणात वाढीव विजबील देण्‍यात आली. विजबीलाच्‍या संदर्भातही सरकार उदासिनच असून, अनुदानाच्‍या रक्‍कमाही शेतक-यांना मिळाल्‍या नाहीत त्‍यामुळे शेतक-यांना कोणताही दिलासा हे सरकार देवू शकलेले नाही हे अर्थसंकल्‍पातून स्‍षष्‍ट झाले असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

पायाभूत सुविधांच्‍या बाबतीत जाहीर केलेल्‍या योजनांमध्‍ये केंद्र सरकारचा सहभाग आहे. केंद्राच्‍या सहकार्याने या योजना पुर्ण होणारच आहेत मग सरकार म्‍हणून तुम्‍ही राज्‍याला नवीन काय दिले? असा प्रश्‍न उपस्थिती करुन, आ.विखे पाटील म्‍हणाले की, सरकारने फक्‍त आकड्यांचे फुलोरे फुलविले आहेत. महापालिकांच्‍या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सरकारने केवळ घोषणा केल्‍या, या योजनांसाठी निधी कुठून आणि कसा आणणार हे सरकार स्‍पष्‍टपणे सांगु शकत नाही. सरकारकडे फक्‍त कल्‍पनाशक्‍ती आहे, मात्र इच्‍छाशक्‍तीचा अभाव आहे हे यातुन दिसून येते. हे सरकार फक्‍त पर्यटनात गुंतले आहे. गृह खात्‍यापेक्षा पर्यटन विभागाला जादा निधी दिला जातो हे महाराष्‍ट्राचे दुर्दैव असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्‍य सरकार कमी करु शकले नाही त्‍यामुळे केंद्र सरकारवर टिका करण्‍याचा कोणताही आधिकार महाविकास आघाडी सरकारच्‍या नेत्‍यांना आता राहीलेला नाही. सातत्‍याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली निष्‍क्रीयता सरकार लपवि‍ण्‍याचा प्रयत्‍न करते. अर्थसंकल्‍पातूनही या सरकारची उदासीनता स्‍पष्‍ट झाल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *