मंत्रालयातील ३५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोना!

0
20201211_213858

मंत्रालयातील ३५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोना!
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी.

राज्यात मागील आठवड्यापासून वाढत असलेल्या कोरोनाने मुंबईतील मंत्रालयालाही विळखा घातल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. मंत्रालयातील महसूल, शिक्षण व इतर विभागाच्या ३५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सोमवारी आणखी २३ कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. शिक्षण विभागातील १२ जणांन कोरोनाचे लागण झाली आहे. महसूल विभागात सोमवारी आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन उपसचिव, चार अवर सचिव, तीन कक्ष अधिकारी, चार सहाय्यक कक्ष अधिकारी आणि आठ लिपिक अशा २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांचे कक्ष सील करण्यात आले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्यांवर निर्बंध आणावेत अशी मागणी मंत्रालयातील अधिकारी तसे विविध मंत्रालयीन कर्मचारी संघटनांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *