भाजपात ‘संघजिहाद’ पद्धत सुरु झाली आहे का?

0
20201127_190001

भाजपात ‘संघजिहाद’ पद्धत सुरु झाली आहे का ? सचिन सावंत
मुंबई, दि. १९ फेब्रुवारी.
भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले हेही आपल्यासमोर असताना भाजपाची प्रगती त्याच्याही पुढे झाली असून उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपात ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपासाठी काही वेगळे प्रावधान केले आहे का? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला पक्ष पदाधिकारी पदावर नियुक्ती केली जाते आणि दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपाचे हे वागणे म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असे दिसते. भाजपात तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपाने सुरु केली आहे काय याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असे सावंत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *