शिवसेनेच्या संपर्क अभियानावर आशिष शेलार काय म्हणाले?

0
20201121_120635

शिवसेनेच्या संपर्क अभियानावर आशिष शेलार काय म्हणाले?

मुंबई, दि. 16 फेब्रुवारी :
बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत? समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टँक्स वसूली करुन पाकिटमारी का करताय?..असे बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत त्यामुळे जाच तुम्ही घराघरात, असा टोला भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी लगावला आहे.

शिवसेनेने जाहीर केलेल्या संपर्क अभियानाबाबत बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की,
घराघरात जाताय?जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे. कोरोनाला घाबरून “घराघरात” लपून का बसला होतात?मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात? एकही रुपयांची मदत का दिली नाही? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय? असे प्रश्न त्यांनी उपस्थितीत केले आहेत.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाबत ते म्हणाले की, लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही त्यांनी केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *