20201028_134702

…हा तर सरकारच्या मनाचा कद्रूपणा!
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील

पुणे, दि. 11 फेब्रुवारी:

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारणे म्हणजे राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे. आम्हाला जे हवे तेच आम्ही करणार अशी ताठर भूमिका सरकार घेत आहेत. कारण या सरकारला लोकांनी निवडून दिले नाही, त्यामुळे आम्ही जनतेला उत्तर देण्यास बांधील नाही अश्या अर्विभावात सरकार वागत असल्याची जोरदार टिका चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.

राज्यपाल शासकीय विमानाने प्रवासाला निघाले असताना त्यांना त्या विमानातून उतरविण्यात आले. हे फार दुदैर्वी आहे. त्यानंतर ते खाजगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले असे सांगतानाच चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्य सरकाचा हा प्रकार म्हणजे सूडाचे व द्वेषाचे राजकारण आहे. भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांनी देशाच्या हितासाठी ट्वीट केले. त्या ट्वीटचेही चौकशी करण्याचे आदेश सरकारने काढले. देशात सर्वांना अभियव्यक्तीस्वातंत्र आहे, मग या भारतरत्न व्यक्तींनी देशहिताप्रती आपले मत व्यक्त केले तर त्यामध्ये त्यांचा गुन्हा काय झाला असा सवालही दादा पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली. पण 48 तास झाले तरी पोलिसांनी या गंभीर प्रकरणात काहीही कारवाई केलेली नाही. राज्य सरकारने यापूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतली. यामुळे जो हम करे सो कायदा असा प्रकार सध्या सरकारकडून सुर असल्याची टिकाही दादा पाटील यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *