‘तुमच्या’ गलथान कारभाराचा ‘शॉक’ लोकांना का? वीज बिलात ५० % सवलत द्या!

0
MNS Raut 22

‘तुमच्या’ गलथान कारभाराचा ‘शॉक’ लोकांना का? वीज बिलात ५० % सवलत द्या!

मुंबई, दि. २ जुलै २०२०

लॉकडाऊनच्या काळात तीन महिने मिटर रिंडिंग न घेता सरासरी वीज बिल आकारणाऱ्या वीज कंपन्यांनी नंतर जुन महिन्याचे बील मात्र अव्वाच्या सव्वा पाठवले आहे. घरगुती वापराची ही वीजबिले भरमसाठ असून काहींना तर १० हजार ते २५ हजार रुपयांचीही बीले आली आहेत. हा सगळा गोंधळ वीज कंपन्यांच्या गलथान कारभारामुळे झाला असून त्याचा नाहक त्रास लोकांना कशासाठी? ही वीज बिले बदलून सुधारीत वीज बिले ५० टक्के सवलतीने द्या, अशी मागणी मनसेने ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन केली आहे.

वीज मंडळाच्या तुघलकी कारभाराची दखल घेत मनसेने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटून या कारभारावर संताप व्यक्त केला. या वीज बिलांचे समर्थन ऊर्जा मंत्र्यांनी आधीच केले असले तरी मनसने मात्र ग्राहकांना सुधारित वीज बिले पाठवा व त्यात ५० % सवलत देण्यात यावी. लॉकडाऊन काळात केलेली दरवाढ (fixed charges व electricity duty) रद्द करून पूर्वीचेच दर आकारावे. ग्राहकांना बिले भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत मीटर लाईन/वीज पुरवठा खंडीत करू नये. ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे, या मागण्या केल्या आहेत. नितीन राऊत यांनी मनसेने उपस्थित केलेले सर्व मुद्दे समजून घेतले आणि लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचे मान्य केले.

या बैठकीत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, सरचिटणीस नयन कदम, उपाध्यक्ष अरविंद गावडे, नंदकुमार चिले आणि ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.

मनसेच्या या मागण्या सरकार मान्य करते, का त्यांना मनसे ‘स्टाईल’ समज देण्याची वेळ येते ते लवकरच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *