लॉकडाऊनमुळे कंटाळलात ना ? मग चलो गोवा, पण….!

0
Welcome Goa

मुंबई, २ जुलै २०२०

लॉकडाऊन व Work From home मुळे सर्वजण प्रचंड कंटाळलेले आहेत. घरातून कधी बाहेर पडून थोडे ‘फ्रेश’ व्हायला कोणाला आवडणार नाही ? एप्रिल-मे चा पर्यटन बेतही हुकला. पण चिंता नसावी…आता गोव्याला जाऊन थोडासा ‘लाईफ झिंगालाला’ करुन येऊ शकता.

देशांतर्गत व परदेशी पर्यटकांची पसंती राहिलेले हॉट डेस्टिनेशन गोवा आता पर्यटनासाठी आज २ जुलैपासून सुरु झाले आहे. फक्त काही अटी व नियमांचे पालन मात्र तुम्हाला करावे लागणार आहे.

गोव्यात जाण्यासाठी सर्वात पहिले तुमच्याकडे ४८ तासातील कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असला पाहिजे. गोव्याच्या सीमेवर तुम्हाला तो दाखवावा लागणार आहे नसेल तर सीमेवर तपासणी करुन तुमचा रिपोर्ट येईपर्यंत गोव्यातील क्वारंटाईन सेंटरचा पाहुणचार घ्यावा लागेल. दुसरे महत्वाचे गोव्यात एंट्री करण्यापूर्वी तुमचे हॉटेल बुकिंग झालेले असले पाहिजे. गोवा सरकारने राज्यातील २५० हॉटेल्सना खुले करण्याची परवानगी दिली आहे. पर्यटन विभागाची परवानगी असलेल्या हॉटेल्समध्येच बुकिंग केलेले असले पाहिजे. ज्या हॉटेल्स अथवा होमस्टे यांनी पर्यटन विभागाची परवानगी घेतलेली नाही त्यांना मात्र व्यवसाय करता येणार नाही तसेच त्यांना ऑनलाईन बुकिंग करण्याची परवानगीही नाही, याची तुम्हीही खबरदारी घ्या. शासनाने कोरोनाच्या काळात व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात ज्या आदर्श नियम, अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे पालन केले गेले पाहिजे, अशी माहिती गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर अजगावकर यांनी दिली आहे.

कोरोनाचे संकट अजून संपलेले नसले तरी गोवा सरकारने पर्यटकांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल १०० दिवसांनंतर गोवा पर्यटकांसाठी हळूहळू सुरु होत आहे. गोव्यात अजून ७१६ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आहेत.

गोव्याला जाण्याचा बेत असेल तर जरुर जा पण सर्व नियम अटींचे पालन करा. गोव्यातही सोशल डिस्टन्स पाळा, मास्क लावा…धमाल करताना सुरक्षेशी तडजोड मात्र करु नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *