बोगस बियाणे विक्रीबाबत शासन कठोर पावले उचलणार!

0
IMG-20210203-WA0016

बोगस बियाणे विक्रीबाबत शासन कठोर पावले उचलणार!
मुंबई दि. ०३ फेब्रुवारी:
राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शासन स्तरावरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधीत कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील असे मंत्रालयीन दालनात पार पडलेल्या बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या रब्बी हंगामात “प्रदिप सेल्स, मेन्टा रोड जालना” या कंपनीमार्फत माहे सप्टेंबर, २०२० कालावधीत जिल्ह्यात जवळपास ८ टन कांदा बियाणे हजारो शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. मात्र सदर कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आतोनात नुकसान झाले होते.

या बाबतची माहिती निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी डॉ. कदम यांच्याकडे केली होती यांची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांचेसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी बोलतांना कृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या मध्ये जर विविध प्रकारच्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर कृषी विभागाच्या वतीने यावर कठोर निर्णय घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्री बाबत सविस्तर माहिती आयुक्त कृषी यांनी घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी सूचना केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *