आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचे बजेट!

0
IMG_20201127_100710

आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचे बजेट!
नवी दिल्ली, दि. 1 फेब्रुवारी:
अर्थमंत्री निर्माला सीतारमन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची जीवनशैली वाढवण्यावर जोर देणारा आहे. सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणारा हा अर्थसंकल्प असून आत्मनिर्भर भारताचे आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचे बजेट आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आजच्या बजेटमध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. आरोग्य व्यवस्थेवर आधारित हे बजेट असून, यामध्ये संशोधनावर आधारित प्रगती करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली गेलेली आहे. संधीची समानता हे सूत्र लक्षात घेत या बजेटमध्ये महिलांसाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. रोजगार संधी वाढवण्यासाठी एमएसई क्षेत्राला चांगला निधी देण्यात आलेला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांना असं वाटत होतं की, सरकार सामान्य जनतेवरचा भार वाढवेल. मात्र आमच्या सरकारने सातत्याने प्रयत्न केला आहे की, अर्थसंकल्प पारदर्शक असायला हवा. मला आनंद आहे की, आज अनेक तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाच्या पारदर्शकतेचे कौतुक केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *