रेणू शर्मावर माजी आमदाराचा हनी ट्रॅपचा आरोप!

0
20210114_170951

रेणू शर्मा विरोधात माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा हनी ट्रॅपचा आरोप, मुंबई पोलिसात तक्रार दाखल…

मुंबई, दि . 14 जानेवारी :

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसात हनी ट्रॅप केल्याबाबतची व पैसे मगितल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत रेणू शर्मा विरुद्ध तक्रार देत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी व हनी ट्रॅप करण्यासाठी अनेक दिवसांपासून पैशाची मागणी करत असल्याचा आरोप केला आहे.

सदर महिला 2010 पासून आपल्याला फोन व मेसेज करून रिलेशनशीपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यावर गुन्हा दाखल करून तिची चौकशी करावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे.

मी अनेकवेळा नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी थोड्यावेळापूर्वी अंधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *