ग्रामीण जनतेला आता अर्सेनिक अल्बम मोफत !

0
corona 22222

 

मुंबई, दि. ३० जून २०२०

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविणे हेसुद्धा महत्वाचे आहे. त्यासाठीच आयुष मंत्रालयाने होमियोपॅथीक अर्सेनिक अल्बम औषधाची शिफारस केल्यानंतर ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील ५ कोटी लोकांसाठी हे औषध देण्याचे निश्चित केले आहे. जिल्हा परिषदेतील समित्या ही औषध खरेदी करुन लोकांना मोफत देतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम म्हणाले.

मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी. आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तत्परतेने पुरवावे. यासाठी जमा केलेल्या निधीतून खरेदीचा खर्च भागविण्यात येईल व खर्च भागवून उर्वरीत रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही मुश्रीफ म्हणाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *