भाजपाच्या ‘आत्मनिर्भर चहा’वर काँग्रेसची फिरकी !

0
20201209_211750

भाजपाच्या ‘आत्मनिर्भर चहा’वर काँग्रेसची टीका..

मुंबई, दि. ६ जानेवारी:
मुंबई भाजपाच्या आत्मनिर्भर टी स्टॉल योजनेची काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींच्या आत्मनिर्भर पकौडा योजनेच्या अभूतपूर्व अपयशानंतर मोदींच्या संकल्पनेतून बेरोजगारांसाठी मुंबई भाजपा प्रस्तुत करत आहेत ढॅण्टॅढॅण…. ”आत्मनिर्भर टी स्टॉल”. अशा अनोख्या पद्धतीने सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींसह मुंबई भाजपावर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत या संदर्भात म्हणतात, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजागार देण्याचे वचन देऊन नरेंद्र मोदी सत्तेवर आले होते. आतापर्यंत सहा वर्षांमध्ये १२ कोटी रोजागार त्यांनी दिले पाहिजे होते. त्याऐवजी १२ कोटी रोजगार होते ते देखील नष्ट झालेले आहेत. बेरोजगाराची एक प्रचंड फौज त्यांनी निर्माण केलेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही, रोजगार तर देता आलेला नाही. परंतु, नवनवीन योजना ते नक्कीच देतात. त्यातीलच एक अतिदुरदृष्टीने प्रेरीत झालेली महत्वाकांक्षेने भारीत झालेली योजना होती “आत्मनिर्भर पकौडा” योजना. त्याच्या अभूतपूर्व अपयशानंतर आता मुंबई भाजपातर्फे मोदीजींच्या संकल्पनेने एक नवी योजना लागू होत आहे, त्याचं नाव आहे “आत्मनिर्भर टी स्टॉल”. असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

आत्मनिर्भर टी स्टॉल योजनेअंतर्गत राज्यात जी कोट्यावधी बेरोजगारांची फौज निर्माण झालेली आहे त्यांना रोजगार देण्याचे एक माध्यम भाजपा घेऊन येत आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो. परंतु एक अपेक्षा व्यक्त करतो. मोदीजींच्या अभूतपूर्व संकल्पनांमधून, योजनांमधून रोजगार तर मिळालेला नाही. परंतू त्यांनी त्याच्याबरोबर अभूतपूर्व तंत्रज्ञानाचा अविष्कार देखील केलेला आहे. त्यातील एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान होते गटरगॅस तंत्रज्ञान. तर चहा बनवायला नक्कीच गटर गॅसचाही उपयोग होईल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *