TIKTOK सह ५९ चिनी apps वर बंदी !
मुंबई, दि. २९ जून २०२०
चीनने भारताचा विश्वासघात करत भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी व २० जवानांना हालहाल करुन मारल्यानंतर चीनवर कारवाई करण्यासाठी देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. चीनवर कारवाई करण्यासंदर्भात नरेंद्र मोदी सरकारवर चौफेर टीका होत होती. यानंतर सरकारने सोमवारी एक महत्वाचा निर्णय घेत चीनवर Digital Attack केला.
बंदी घालण्यात आलेल्या apps मध्ये tiktok, UC browser, Helo, Share it, WeChat, Virus Cleaner.. अशा ५९ apps चा त्यात समावेश आहे.
देशाच्या संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने चिनी अॅप धोकादायक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. IB ने अशा धोकादायक चिनी अॅप्सबाबत केंद्र सरकारला एक अहवालही पाठवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.
