‘एमपीएससी’साठी आता फक्त सहा संधी !

0
20201231_140255

‘एमपीएससी’साठी आता फक्त सहा संधी !

मागास प्रवर्गासाठी नऊ संधी, एससी एसटीसाठी मर्यादा नाही.

मुंबई , दि. 31 डिसेंबर  :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परिक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा घातली असून या मर्यादेमुळे शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणा-यांसाठी मोठा धक्का आहे..केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीनेही कमाल संधी निश्चित केल्या आहेत .

नव्या नियमानुसार खुल्या गटातील उमेदवारांना कमाल सहा संधी, मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधींची मर्यादा लागू नसेल.

आतापर्यंत स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ‘एमपीएससी’कडून अशी मर्यादा घातलेली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवार सातत्याने स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत होते. उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास तीही त्याची संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास त्याची परीक्षेस असलेली उपस्थिती संधीत गणली जाईल.

एमपीएससीच्या या निर्णयावर तरुण वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून हा निर्णय अन्यायकारक आहे अशी त्यांची भावना आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *