काँग्रेस नेते राजाराम देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन!

0
IMG-20201229-WA0048

काँग्रेस नेते राजाराम देशमुख यांच्या संकल्पनेतून
साकारलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन!

मुंबई, दि. 29 डिसेंबर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम देशमुख यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाबासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत गांधी भवन मुंबई येथे 2021 सालच्या या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांच्या दिनविशेष संबंधित माहिती या दिनदर्शिकेत आहे.

या प्रकाशन सोहळ्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, यशवंत हप्पे, शरद आहेर, रामचंद्र दळवी, आशिष दुबे, प्रदीप चौबे यांच्यासह काँग्रेसचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *