मुंबईत ३१ डिसेंबरला ‘नो झिंगाट, नो सेलिब्रेशन’!
मुंबईत ३१ डिसेंबरला ‘नो झिंगाट, नो सेलिब्रेशन’!
मुंबईकरांची ३१ डिसेंबर पोलीसांच्या नजरेत !
मुंबई, दि. २७ डिसेंबर:
कोरोनाने यंदा सगळ्याच प्रकारच्या आनंदावर विरजण टाकले आहे. सरत्या वर्षातील सण उत्सावावर कोविडच्या काटेकोर नियमामुळे बोतानेच साजरे करावे लागले. आता वर्ष सरताना होणाऱ्या ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवरही निर्बंध आहेत. सरकारने गर्दी करण्यावर निर्बंध घातले आहेत. मंबईकरांना आता सोसायट्यांच्या गच्चीवरही पार्टी करता येणार नाही. बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजक आणि गर्दीवर कारवाई करण्यात येणार आहे.
जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात काही अप्रिय घडना घडू नयेत यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात असणार आहेत.
नाइट कर्फ्यूच्या निर्बंधामुळे हॉटेल, पब रात्री ११ वाजता बंद करावे लागतील अन्यथा परिणाम भोगावे लागतील. नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांवर तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील.
नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी आहे. पण निर्बंध असले तरी, मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या गेट वे ऑफ इंडिया. मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. पण चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत.
