इंग्लंडहून महाराष्ट्रात आलेले १६ जण कोरोना पॉझिटिव्ह!
इंग्लंडहून महाराष्ट्रात आलेले १६ जण कोरोना पॉझिटिव्ह!
मुंबई, दि.२६ डिसेंबर:
इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजपर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
( नागपूर –४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी-३, पुणे-२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित कोरोना बाधित आढळले आहेत.
इंग्लंड मध्ये आढलेल्या नव्या विषाणूमुळे जगभर खळबळ माजली असून अनेक देशांनी इंग्लंड बरोबरची हवाई सेवा बंद केली आहे.
