EWS मुळे आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार!

0
20201224_161409

EWS मुळे आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार!
भाजपा खासदार संभाजीराजे यांचा इशारा.
पुणे, दि. २४ डिसेंबर :
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा लाभ देण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकराने घेतलेला निर्णयावर तीव्र पडसाद उमटत आहेत. २५ जानेवारीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण संदर्भात सुनावणी होत असून यावेळी ईडब्लूएसमुळे मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास ठाकरे सरकार जबाबदार असेल असा इशारा भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

संभाजीराजे म्हणाले, राज्य सरकारने नेमलेल्या वकिलांसोबत झालेल्या चर्चेमध्ये सरकारच्या वकिलांनी ईडब्ल्यूएस आरक्षण घ्यायचं असेल तर ते न्यायालयातून घ्यावे. राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेऊ नये अन्यथा न्यायप्रविष्ट असलेल्या जाती आधारित आरक्षणावर त्याचा परिणाम होईल अशी शिफारस केली होती. मात्र मंत्री अशोक चव्हाण यांनी ऐकले नाही.

ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्यास न्यायप्रविष्ट असलेल्या जाती आधारित आरक्षणाला धोका निर्माण होईल अशी आम्हाला भीती वाटते. जर ईडब्ल्यूएस आरक्षण घ्यायचं असेल तर ते पुढील वर्षी देखील घेता येईल.

सरकारच्या या निर्णयाची पुण्यात मराठा समाजाने होळी केली करुन तीव्र निषेध व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *