ब्रिटनहून भारतात आलेल्या २१ प्रवाशांना कोरोना.
ब्रिटनहून भारतात आलेल्या २१ प्रवाशांना कोरोना.
मुंबईत आलेले सर्व ५९० प्रवाशी हॉटेलमध्ये क्वारंटाईन.
नवी दिल्ली, दि. 23 डिसेंबर :
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातले असून आधीच्या कोरोनापेक्षा हा नव्या प्रकारचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. या नव्या विषाणूमुळे जगभरात चिंता वाढली आहे. ब्रिटनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतात पोहचलेल्यापैंकी २१ प्रवासी कोरोना संक्रमित आढळले आहेत.
ब्रिटनहून आलेले हे प्रवासी कोरोना संक्रमित आढळले असले तरी हा ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाचे नवे स्वरुप आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. संक्रमित व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत.
हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झाले होते. त्यामुळे संबंधित राज्यांत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली जात आहे..
ब्रिटनमधून मुंबईत आलेल्या ५९० प्रवाशांपैकी एकही कोरोना संक्रमित आढलेला नाही परंतु त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रवशांना सात दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा बुधवारपासून ३१ डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे. मंगळवारी ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले. कोरोनाचा नव्या प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
