सोनिया गांधींच्या पत्रानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांना आली जाग.

0
20201207_173746

सोनिया गांधींच्या पत्रानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांना आली जाग.

सोनिया गांधी यांच्या सूचना SC/ST ना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास उपयुक्त – डॉ. नितीन राऊत

अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध.

नागपूर, दि. 20 डिसेंबर :
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रानंतर राज्यातील काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. मागास समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध असून भाजपा सरकारवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
सोनिया गांधी यांनी केलेल्या सुचना किती महत्त्वाच्या आहेत याचा पाढा वाचून दाखवण्यात राज्यातील मंत्री सरसावले आहेत.

ठाकरे सरकार मधील काँग्रेसचे मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पत्राचे महत्व किती आहे हे सांगितले. पण ते सांगताना भाजपा सरकारमुळेच या समाजाचा विकास कसा खुंटला हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

राऊत म्हणतात, ‘अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनुसूचित जाती व जमातीबाबत धोरण ठरवून विकासासाठी केलेल्या सूचना अंत्यत महत्वाच्या आहेत. या सुचनांचे पालन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार करेल.

काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी या अनुसुचीत जाती जमाती व मागास घटकांच्या हितासाठी, कल्याणासाठी कायम आग्रही राहील्या आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र व काँग्रेस पुरस्कृत राज्यांत मागास वर्गीयाच्या अनेक महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या सूचना या अनुसुचित जाती, जमातीच्या सर्वांगिण विकासासाठी अंत्यत महत्वपूर्ण असून, या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

महाराष्ट्रातील आधीच्या भाजप सरकारच्या काळात अनुसुचीत जाती, जमातीच्या विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला होता, शिवाय सरकारची अनेक धोरणे व योजना मागासवर्गींय घटकांसाठी अन्यायकारक ठरल्या होत्या, असेही राऊत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *