…. तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही!
… तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही !
दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय.
नवी दिल्ली, दि. 18 डिसेंबर:
लग्नाचे वचन देऊन एखाद्या पुरुषाने महिलेशी शरीरसंबंध ठेवले असतील तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एक महिला अनेक महिन्यांपासून एका पुरूषासोबत राहत होती तीने त्या पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने हा बलात्काराचा गुन्हा रद्द ठरवत ‘दीर्घ आणि अनिश्चितकालीन शरीर संबंध असतील तर लग्नाच्या वचनाला संभोगासाठी दिलेलं आमिष म्हणता येणार नाही. बलात्कार तेव्हाच म्हणता येईल ज्या घटनेत महिला पीडित असेल अथवा तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवण्यासाठी सक्ती करण्यात येईल.
न्यायालयाने पुढे असेही म्हटले आहे की, लग्नाचे अमिश दाखवून जर सेक्स केला जात असेल तर त्या गोष्टीसाठी महिलेच्या सहमतीचा गैरवापर आहे. अशा घटनेमध्ये कलम 375 अंतर्गत बलात्काराची तक्रार दाखल होते. परंतू, अशा घटना जर वारंवार घडल्या असतील तर त्याला महिलेची संमती होती असे मानले जाईल.
या प्रकरणात संबंधित पुरुषाला सत्र न्यान्यायालयाने दोषमुक्त केले होते. त्याला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते पण सत्र न्यायालयाचा निर्णय कायम राखत आरोपीला दोषमुक्त केले.
