माजी आमदार राजीव आवळे राष्ट्रवादीमध्ये.

0
IMG-20201216-WA0024

माजी आमदार राजीव आवळे राष्ट्रवादीमध्ये.

मुंबई दि. १६ डिसेंबर:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणारांचा ओघ सुरू असून आज
जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. दोन्ही खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. पक्षावर आणि पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

कोल्हापूर जिल्हयात आणखी चांगली संघटना वाढवूया. इचलकरंजी, हातकणंगले या भागातील बर्‍याच प्रश्नांना दादांनी न्याय दिला आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.

राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे आता नाहीत पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अगोदरच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते सध्या तरी अपक्ष आहेत. त्यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे. भाजपने धमक्या दिल्या होत्या. आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ पिष्ठे, मदन कारंडे, बी. के. चव्हाण, प्रकाश पाटील उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *