मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी!
मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी!
तिजोरीत पैसा नसताना नुतनीकरण कशासाठी?
मुंबई, दि. 14 डिसेंबर :
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झालेली असताना मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यवधी कोट्यावधींची उधळपट्टी केली जात आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना ही उधळपट्टी कशासाठी असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कोणाच्या बंगल्यावर किती खर्च….
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर 3 कोटी 26 लाख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 1 कोटी 78 लाख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुडा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 33 लाख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगलावर दोन कोटी 26 लाख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगल्यावर 1 कोटी 46 लाख रुपये खर्च केले आहेत.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर 3 कोटी 89 लाख, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शिवनेरी बंगल्यावर 1 कोटी 44 लाख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या b3 या बंगल्यावर 1 कोटी 40 लाख, नितीन राऊत यांच्या पर्णकुटीवर 1 कोटी 22 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत आणि नंदनवन या दोन्ही बंगल्यांवर दोन कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सरकार बदलले की मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील ऑफिसच्या नुतनीकरण करत अशीच उधळपट्टी केली जात असते.
