मुंबईत कोरोना लसीकरणासाठी ५०० पथके!

0
20201212_143658

मुंबईत कोरोना लसीकरणासाठी ५०० पथके !

दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.

१ लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी.

मुंबई, दि 12 डिसेंबर :
कोरोना लसीकरणाला अजून परवानगी दिली नसली तरी प्रशासकीय पातळीवर लसीकरणासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ५०० पथके तैनात केली जाणार आहेत.

कोरोना लसीची पहिली मात्रा १० ते १२ दिवसांमध्ये, तर दुसरी मात्रा २१ ते २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने ‘मुंबई महानगर कृती दल’ स्थापन केले आहे. लसीकरणासाठी कृती दलाप्रमाणेच विभागीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

कांजूरमार्ग येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर करोनाची लस साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असून ही जागा ‘प्रादेशिक लस भांडार’ म्हणून निर्देशित करण्यात आली आहे.

ही लस तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पालिका आणि खासगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, एसटी, बेस्ट कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून लस घेण्यापूर्वी संबंधितांना ओटीपी क्रमांक दाखवावा लागणार आहे. लसीकरणासाठी नावांची यादी, पत्ता आदी माहिती मागविण्यात येत आहे. विशेष म्हणजे लसीकरणात काळाबाजार होऊ नये यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *