७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या ‘भारत बंद’ मध्ये सहभागी व्हा!

0
20201208_101327

७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या ‘भारत बंद’ मध्ये सहभागी व्हा !

मुंबई, दि. 8 डिसेंबर:

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घिसाडघाईने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केले आहे.

भारत बंदबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही.

“७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!”, असे ट्विट करत बाळासाहेब थोरात यांनी भारत बंद मध्ये लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *