डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसचे अभिवादन !

0
IMG-20201207-WA0001

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसचे अभिवादन !

मुंबई, दि. 7 डिसेंबर:

संविधानाचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त मुंबई काँग्रेस कार्यालय तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यालय, टिळक भवन येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी भवंरसिंह राजपुरोहीत, मधुकररावजी चव्हाण, वीरेंद्र बक्षी, राजू ठक्कर, शिवकुमार लाड, जो. जो. थाॅमस, लक्ष्मण कोठारी, कचरू यादव, जयंत लोखंडे यांच्यासह काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महापरिनिर्वाणदिनी काँग्रेस पदाधिका-यांनी दादर येथील चैत्यभूमी वर जावून महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *