20201202_184133

कोरोनावरची लस आली. ‘या’ देशात लस देण्यास मान्यता!
भारतात कोरोनावरील लस कधी येणार ?

लंडन, दि. २ डिसेंबर:

कोरोनाने अख्ख्या जगासमोर मोठे संकट उभे केले असून कोरोनावर लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागले असताना एक आनंदाची बातमी आली आहे. फायजर कंपनीच्या लसीने सर्व बाबतीत पात्रता सिद्ध केली असून इंग्लंडने फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे. कोरोनावर लस उपलब्ध करुन देणारा इंग्लंड हा पहिला देश ठरला आहे.

फायझर आणि बायोएनटेकच्या या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणाम कारकता या सर्वांत ही लस योग्य ठरली असून ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतात मात्र अजूनही कोरोनाच्या लशीला मान्यता मिळालेली नाही. लवकरच भारतातही लस उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *