आषाढी एकादशीला पंढरपूर प्रदक्षिणा परवानगी द्या: सुधाकर इंगळे महाराज
सोलापूर/पंढरपूर दि, २५ जून २०२०
पंढरपूर येथे प्रत्येक महिन्याला वारी निमित्ताने लाखो वारकरी येतात. आषाढीवारी हा वारकरी परंपरेतील महत्वाचा व सर्वश्रेष्ठ सोहळा आहे. वारी हा त्यांचा जीव की प्राण आहे. पिढ्यान पिढ्या वारकरी वारीला नित्यनेम पूर्ण करण्यासाठी येतात,त्यांना नगर प्रदक्षिणा करण्याची परवानगी देऊन सहकार्य करावे, अन्यथा भजन आंदोलन करु असा इशारा, अ. भा. वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात रेड झोन मधील दुकाने, व्यवहार तसेच सर्व कंटेनमेन्टझोन मधील दुकाने, व्यवहार, माणसांची ये जा सुरळीत चालू आहे. मार्केटमधील गर्दीवर नियंत्रण नाही, सर्व ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत चालू असताना वारकऱ्यांच्या प्राणप्रिय वारीलाच बंदी का केली जात आहे. वारकरी परंपरा, आषाढी वारीला प्रतिबंध का केला जात आहे. महाराष्ट्रात सर्व तीर्थक्षेत्र प्रवेश सुरु आहे. तर पंढरपूर प्रवेश बंद का केला. हा वारकरी भाविकांवर, संप्रदाय, परंपरा यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे का, असे प्रश्न इंगळे महाराज यांनी उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व पालखी, पादुका, वारकरी यांना नियम व अटी घालून एकादशीला पंढरपूर नगर प्रदक्षिणा करणेसाठी लवकरात लवकर परवानगी देऊन सहकार्य करावे. सध्या जे वारकरी पायी चालत पंढरपूरला येत आहेत. त्या वारकरी भाविकांनाही एकादशीला पंढरपूर नगर प्रदक्षिणा परवानगी द्यावी यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना निवेदनही पाठवण्यात आले असल्याची माहिती सुधाकर इंगळे
