सर्वांचीच चौकशी करा, सत्य जनतेसमोर येऊ द्या.

0
20201109_191717

सर्वांचीच चौकशी करा, सत्य जनतेसमोर येऊ द्या.

घोटाळेबाज जिल्हा, अर्बन बँकांच्याही चौकशा करा.

मुंबई दि. 2 डिसेंबर:
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपावर आरोप करत आहेत. ज्या गोष्टीची चौकशी सुरु आहे व त्याचा निष्कर्ष जनतेसमोर येईल त्यामुळे कुठल्याही चौकशीत कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही. योग्य ती चौकशी होऊन कारवाई होईल.
परंतु राज्यातील सर्व जिल्हा बँक, अर्बन बँक किंवा पतपेढ्या ज्यांचे घोटाळे आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असुदे एकदाच या सर्वांच्या चौकश्या लावा व सत्यस्थिती महाराष्ट्रातील जनतेसमोर आणा, असे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.

खडसे यांनी उल्लखे केलेल्या अकराशे कोटीच्या कवडी मोलाच्या जमिनीवर दरेकर यांनी सवाल केला आहे. राज्य सहकारी बँकेने जे कारखाने लिलावात काढले आहेत. त्याची किंमत सुमारे ५०० कोटी होती पण ते कारखाने १० कोटीला विकले त्याची चौकशी प्रथम करा. बुलढाणा अर्बन बँक, वर्धा बँक, नागपूर बँक या ज्या बँक डुबविण्यात आल्या त्यांची चौकशी करा अशी मागणीही दरकेर यांनी केली.

राज्य सहकारी बँकेने अश्या ठिकाणी कर्ज दिले जिथे जिथे फक्त जागा आहे पण प्रकल्प सुध्दा नाही अश्या प्रकल्पाना कर्ज देण्यात आली आहेत. घोटाळे झालेल्या राज्यातील सर्व जिल्हा, अर्बन किंवा पतपेढ्या यांच्या चौकश्या लावा व सत्यस्थिती महाराष्ट्रातील जनतेसमोर आणा. प्रत्येक वेळेला पक्ष व नेते आपापल्या सोयीने चौकशीचे जे गु-हाळ उभं करतात ते महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *