राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन…
पंढरपूर, दि. 28 नोव्हेंबर:
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. आमदार भारत भालके यांना काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी मातही केली होती. मात्र, त्यांना पोस्ट कोविडचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
भारत भालके यांचा जनतेशी दांडगा संपर्क होता. सलग तीन वेळा ते विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघातून त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला.
