महान फुटबॉलपटू मॅरेडोनाचे निधन!

0
IMG_20201125_225634

महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन!
मुंबई, दि. 25 नोव्हेंबर:

अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

गरीब कुटुंबात जन्मलेल्या मॅरेडोनाला अर्जेंटिनामध्ये हिरो मानले जाते. मॅरेडोनाने 91 सामन्यांत 34 गोल केले. क्लब स्तरावर मॅरेडोनाने 588 सामन्यात 312 गोल केले. मॅराडोनानी 1986 मध्ये अर्जेंटिनाला मॅक्सिको येथील विश्वचषक जिंकवून दिला होता.

अर्जेंटिनामधील आबालवृद्धांमध्ये मॅरेडोना यांची क्रेझ होती. फुटबॉलच्या मैदानात घोंघावणारे वादळ आज शांत झालं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *