ठाकरे सरकारविरोधात जनतेत असंतोष.
तीन पक्षांच्या राजकारणात जनता भरडली जाते..
ठाकरे सरकारविरोधात जनतेत असंतोष ….
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर:
महाविकास आघाडी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून जनतेत या सरकारबद्दल मोठा असंतोष आहे. कोरोना परिस्थीती हाताळ्यात हे सरकार अपयशी ठरले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.तीन पक्षांच्या राजकारणात महाराष्ट्रातील जनता मात्र भरडली जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या सरकारला आता एक वर्ष पूर्ण होईल पण महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्यादृष्टीने एकही काम या सरकारने केलेले नाही. तीन पक्षांमध्ये समन्वय नाही त्यामुळे या तीन पक्षांच्या राजकारणात महाराष्ट्राची जनता भरडली जाते आहे.
राज्याच्या अनेक भागात दौरा करुन पाहणी केली. जनतेशी संवाद साधला. अजूनही नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही ठिकाणी तर पंचनामेही झालेले नाहीत. फक्त कामांना स्थगिती देणे एवढेच या सरकारचे धोरण आहे. अनेक प्रश्नांच्या बाबतीत राज्य सरकारची निष्क्रियता दिसून आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
