पंढरपुरात संचारबंदी..घरातून घ्या विठोबाचे दर्शन!

0
IMG-20201116-WA0072

पंढरपुरात संचारबंदी..घरातून घ्या विठोबाचे दर्शन!

कोरोनामुळे यंदा कार्तिक वारीवरही निर्बंध…

पंढरपूर, दि. २५ नोव्हेंबर :
कोरोनाचे वाढते संकट पाहता यंदा कार्तिकी वारीसाठी
वारकऱ्यांना पंढरपुराला जाता येणार नाही. पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील भाविक, वारकरी पंढरपुरात येऊ नये यासाठी पंढरपूर शहरात अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर आणि लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रुक्मिणीचे सध्या सुरु असलेले मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

संचारबंदी तसेच विठठ्ल दर्शन बंद करण्यात आले असले तरी देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार आहेत.
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील 6 विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *