काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन!

0
IMG_20201125_091201

काँग्रेसचे रणनितीकार अहमद पटेल यांचे निधन !

कोरोनावर उपचार सुरू असताना झाला मृत्यू .

नवी दिल्ली, दि. 25 नोव्हेंबर:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्य सभा खासदार आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले. अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांचे निधन झाले.

पटेल यांच्या मुलाने ट्विट करून माहिती दिली की,
माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाले आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *