कोविड लस वितरणासाठी टास्क फोर्स..
कोविड लस वितरणासाठी टास्क फोर्स..
पंतप्रधान मोदींशी मुख्यमंत्र्यांची चर्चा ..
मुंबई, दि. 24 नोव्हेंबर:
कोरोना संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे. दिल्ली, मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली.
‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलणे सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
या टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.
