शिवसेना नेते प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचे छापे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचे छापे.
ठाणे, दि. २४ नोव्हेंबर:
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने सकाळी छापे मारले. सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई, ठाण्यातील १० ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली.
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने हे छापे मारले आहेत. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश, विहंग सरनाईक यांच्या घरावरही ईडीचे पथक धडकले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले.
