एसटीच्या खाजगीकरणाचा डाव उधळून लावू!

0
20201028_184459

एसटीच्या खाजगीकरणाचा डाव उधळून लावू !

एसटी बस, डेपो गहाण ठेवण्याची वेळ का आली?
औरंगाबाद , दि. 23 नोव्हेंबर:

एसटी महामंडळ तोट्यात असताना राज्य कर्मचाऱ्यांची देणी तसेच इतर प्रशाकीय खर्चासाठी महामंडळाने एसटी बस डेपो तसेच एसटी बसेस तारण ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एसटीच्या आगारांना तारण ठेवण्यास कामगारांचा विरोध आहे. एसटीची मालमत्ता ही जनतेची असून महाविकास आघाडी सरकारचा एसटीच्या खाजगीकरणाचा डाव उधळून लाऊ, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे .

दरेकर म्हणाले, एस टी महामंडळावर बसेस गहाण ठेवण्याची वेळ का आली ? सरकार म्हणून आर्थिक पेच सोडवण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली असून महाराष्ट्राच्या जीवन वाहिनीच्या आर्थिक पूनर्बांधणीसाठी सरकारनेच पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे.२००० कोटींच्या कर्जासाठी एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा डाव आहे.

सरकारने कर्ज काढून एसटी महामंडळाला मदत करण्याची आणि महाराष्ट्राच्या जीवन वाहिनीच्या आर्थिक पूनर्बांधणीसाठी पाऊले उचलण्याची आवश्यकता होती. व्यवहारात गुप्तता पाळण्याऐवजी पारदर्शकता आणा असेही दरेकर म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *