… कोरोना वाढला तर ‘हे लोक’ जबाबदारी घेणार का?
… मग कोरोना वाढला तर ‘हे लोक’ जबाबदारी घेणार का?
कोरोनावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला सवाल.
मुंबई, दि. 22 नोव्हेंबर:
मला राजकारण करायचे नाही पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले जबाबदारी घेणार का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला केला आहे. भाजपासह इतर विरोधी पक्ष मंदिर उघडा, छटपूजेला परवानगी द्या अशा मागणी करत आहेत त्यांना सुनावले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत.
आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे, असे आवाहन त्यांनी वारक-यांना केले.
