हुतात्म्यांना काँग्रेसकडून अभिवादन !

0
20201121_182706

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना काँग्रेसकडून अभिवादन !
मुंबई, दि. २१ नोव्हेंबर
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात १०५ जणांना हौतात्म्य आले. या हुतात्म्यांना आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिनी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा. एकनाथ गायकवाड व सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी दादर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आनंद यादव, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे खजिनदार संदीप शुक्ला, सचिव शिवकुमार लाड, बेस्ट समिती सदस्य राजू ठक्कर, एस. सी. विभाग अध्यक्ष कचरु यादव व उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *