वीजबिल सवलतीची फाईल एका मंत्र्याने दाबली!
वीजबिल सवलतीची फाईल एका मंत्र्यांने दाबली!
वीजबील न भरण्याचे वंचितचे आवाहन !
अकोला, दि. २० नोव्हेंबर:
कोरोना काळातील विज बिलात जनतेला 50 टक्के सुट देण्यास महावितरणने तत्वतः मान्यता दिली होती. त्या संदर्भातील एक फाईल व त्यावरील शेरा हा विचारात घेण्याची गरज आहे.पण ती फाईल राज्यातील एका मंत्र्यांने दाबल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
राज्याच्या उर्जा मंत्र्यांना महावितरण कंपनीने सुट देण्यासंदर्भात व ती सुट दिल्याने कुठलाही फरक पडणार नाही, असा शेरा असलेली फाईल माहिती नाही. त्यामुळे पहिले सुट देण्याची घोषणा केल्या गेली व आता पुर्ण वीज बिल भरण्याचा आदेश उर्जा मंत्री देत आहे. अशा वेळी राज्यातील जनतेच्या पाठिशी वंचित बहुजन आघाडी राहणार आहे. जनतेने वीज बिल भरु नये. वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडल्यास वंचितचे कार्यकर्ते हे कनेक्शन पुन्हा जोडून देतील, अशी ग्वाही अॅड. आंबेडकर यांनी दिली.
वीज बिल माफी संदर्भात राज्यातील उर्जा मंत्र्यांची भूमिका दूटप्पी आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्याचा कारभार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चालवित आहे का एक मंत्री ज्याने ही फाईल दाबली तो राज्याचा कारभार चालवित आहे, अशी विचारणा यावेळी अॅड.आंबेडकर यांनी केली.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते व युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जि. प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, चंद्रशेखर पांडे, राम गव्हाणकर, आदी उपस्थित होते.
