महाराष्ट्राची मुख्यमंत्री मराठा स्त्री व्हावी!

0
IMG_20201120_190023

महाराष्ट्राची मुख्यमंत्री मराठा स्त्री व्हावी .
भाजपा नेते आशिष शेलारांची इच्छा..

मुंबई, दि. 20 नोव्हेंबर:
भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज एकाच फटक्यात अनेक निशाणे साधली. एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. तसं झालं तर माझ्यासारख्या माणसाचंही त्याला समर्थन असू शकतं,’ अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच व्यक्त केली. शेलार यांनी जाहीरपणे हे व्यक्तव्य केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते.

चोरमारे यांच्या पुस्तकात शरद पवार यांच्या आई शारदाताई यांच्याबद्दलही लेख आहे. त्याबद्दल बोलताना शेलार यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. ‘मोठ्या पदावर अनेक नेते बसलेले आहेत. पवार साहेबांची तुलना कुणाशीही करायची नाही पण मोठ्या मनाचे मोठे नेते खूप कमी असतात, अशा या नेत्याच्या जननीबद्दल जे काही लिहिलं गेलेलं आहे, ते देखील संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारं आहे,’ असे शेलार म्हणाले.

शेलार यांनी पवारांसमोरच हे वक्तव्य केल्याने त्यांचा रोष सुप्रिया सुळे यांच्या रुपाने महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे हे लक्षात येतेच. पण त्याबरोबरच अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनाही इशाराच आहे असे दिसते…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *