कंगणा रनौट आरक्षणावर पुन्हा घसरली.
कंगणा रनौट आरक्षणावर पुन्हा घसरली…
महिला IPS डी. रुपा यांच्याबद्दल कंगणा बरळली.
मुंबई, दि. 20 नोव्हेंबर:
कंगना रानौट या नटीने पुन्हा एकदा आरक्षणावर वायफळ बडबड करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. कर्नाटक मधील महिला आयसीएस डी. रुपा यांच्या एका फेसबुक पोस्ट वर व्यक्त होताना कंगनाची जीभ घसरली.
कंगना म्हणते, रुपा या पोलीस विभागावर डाग आहे. आरक्षणामुळे एवढ्या मोठ्या पदावर हे लोक पोहचतात. जेव्हा एखाद्या अयोग्य आणि लायक नसणाऱ्या व्यक्तीला पद मिळते तेव्हा त्यांच्याकडून त्रास दिला जातो. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत.
मला रुपा यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही मात्र मला खात्री आहे ती त्यांचा हा संताप त्याच्यातील अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेला आहे.
डी. रुपा या कर्नाटकच्या गृहसचिव आहेत. २००० मध्ये त्या लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
दिवाळीमध्ये फटके फोडण्याचा विरोध दर्शवणारी पोस्ट त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन केली होती. यामध्ये त्यांनी फटाके फोडे हे हिंदू संस्कृतीचा भाग नसल्याचे म्हटले होते.
या पोस्ट वर ट्विट करत कंगनाने रुपा यांना लक्ष्य करताना आरक्षणावर घसरली..याआधी ही कंगणाने आरक्षण विरोधी बडबड केली होती.
