वरवरा राव यांना मुंबई हाय कोर्टाचा दिलासा.
वरवर राव यांना हाय कोर्टाचा दिलासा…
नानावटी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी..
मुंबई, दि.18 नोव्हेंबर:
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेल्या ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे.
वरवर राव यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने १५ दिवस नानावटी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली आहे.
उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याविना वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात भेटण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.
