शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट पुन्हा उभारणे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली.

0
IMG_20201117_181248

शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट पुन्हा उभारणे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची शिवसेना प्रमुखांना आदरांजली.

मुंबई दि.17 नोव्हेंबर:
शिवशक्ती भीमशक्ती भाजपची एकजूट पुन्हा उभारणे हीच खरी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त शिवाजी पार्क येथील त्यांच्या शक्तीस्थळाला रामदास आठवले यांनी भेट देऊन विनम्र अभिवादन केले. यावेळी रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजुटीचे स्वप्न आम्ही 2012 च्या मुंबई मनपा निवडणुकीत साकार केले. मात्र नंतरच्या काळात ती एकजूट तुटली याची खंत वाटते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजुटीचा निर्णय घेतला पाहिजे.

शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट उभारणे हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल असे रामदास आठवले म्हणाले.

काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र येतील असा कुणी कधी विचार केला होता का? राजकारणात काहीही होऊ शकते त्यामुळे मागील 25 वर्षे एकत्र रहिलेले भाजप शिवसेना पुनः एकत्र येण्यास कोणतीही अडचण राहणार नाही. शिवशक्ती भीमशक्ती भाजप युती व्हावी ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती असेही रामदास आठवले म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *