20201114_133154

सोलापूर-पुणे हायवेवर रुग्णवाहिकेला अपघात; तीन ठार!

सोलापूर, दि. 14 नोव्हेंबर:

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ एका एॅम्ब्युलन्सला अपघात झाला, यात तीन जागीच ठार झाले तर दहाजण जखमी झाले आहेत. मोहोळ येथे शनिवारी पहाटे चारच्या वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या रुग्णवाहिकेतून एक मृतदेह हैदराबादला घेऊन जात होते. अपघातात एका महिलेसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रुग्णवाहिकेतून ड्रायव्हरचाही समावेश आहे.
रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *