20201113_092316

अमृता मधील ‘अ’ काढला तर ….?

नीलम गो-हेंनी घेतला अमृता फडणवीसांचा समाचार..

मुंबई, दि. 13 नोव्हेंबर:
शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा करणा-या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. अमृता या शब्दातील ‘अ’ चे भान महत्त्वाचे आहे. अमृताताई आपण या दीपावलीच्या दिवसांत अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही’, असा इशारा शिवसेना नेत्या डाॅ. निलम गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे.

डाॅ. नीलम गो-हे पुढे म्हणाल्या, ‘आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मन:स्वास्थ्य चांगले राहते आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते हे देखील आज विसरू नका, असा टोलाही गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

आपल्या नावात ‘अ’ चं महत्त्व आहे आणि ते निघाले तर ‘मृता’ उरेल, असे नमूद करताना तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपा, असा खरमरीत सल्लाही गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे ‘अ’ योग्य बरे का, असे खोचकपणे सुनावताना ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो, असेही नीलम गोऱ्हे यांनी शेवटी नमूद केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *