बातमी सोलापुरकरांच्या कामाची…नगर भूमापन कार्यालयात एक खिडकी कार्यान्वित.

0
soalpur 222

नगर भूमापन कार्यालयात एक खिडकी कार्यान्वित.

सोलापूर, दि. २२ जून २०२०

सोलापूरकरांची गरज लक्षात घेऊन नगर भूमापन कार्यालयाने एक खिडकी कार्यान्वित केली आहे. नागरिकांना मिळकत पत्रिका, सनद, गहाणखत, न्यायालयीन तसेच घरबांधणीसाठी उतारा व नकाशाची आवश्यकता असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरता एक खिडकी सुरु केली आहे. या खिडकीतून नकलेचा अर्ज घेणे नकला देणे, घेणे, मोजणी अर्ज स्विकारणे, टपाल घेणे, असे कामकाज केले जाईल, अशी माहिती नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांनी दिली.

जनतेची कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक पेठेसाठी स्वतंत्र खिडक्या कार्यान्वित केल्या आहेत. परिरक्षण भूमापक यांचेकडे काम असल्यास, जाब-जबाब आणि पंचनाम्यासाठी आणि इतर कामासाठी एक दिवसाआड वार ठरवून दिलेले आहे. त्यानुसार कामकाज करण्यात येईल.

नगरिकांनी ऑफीसमध्ये कधी जायचे?   

सोमवार-बुधवार या दिवशी, न्यू तिऱ्हेगांव, रेल्वेलाईन, लक्ष्मी पेठ, मुरारजी पेठ, अवंतीनगर, उमानगरी, गोल्डफिंच पेठ, मोदी, रामवाडी, दमाणीनगर, शुक्रवारपेठ, गुरुवारपेठ, गणेशपेठ, भद्रावतीपेठ, दाजीपेठ, स्वातंत्र्यसैनिक नगर, कर्णिकनगर, एकतानगर, पदमानगर, न्यु पाच्छापेठ, दत्त नगर, उत्तर सदर बझार, दक्षिण सदर बझार, सिव्हील लाईन….तर मंगळवार व गुरुवारी, पश्चिम मंगळवार पेठ, पूर्व मंगळवार पेठ, सिध्देश्वर पेठ, जोडभावी पेठ, रविवार पेठ, दक्षिण कसबा, उत्तर कसबा, बुधवार पेठ, न्यु बुधवार पेठ, भवानी पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, बेगम पेठ, साखर पेठ,  मुस्लिम पाच्छा पेठ, तेंलगी पाच्छा पेठ या भागातील नागरिकांनी भेट द्यावी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *