मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ‘रयत’चे 2 कोटी 75 लाख!
खा. शरद पवार यांनी रयतच्या कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले सुपूर्द.
मुंबई दि. 10 नोव्हेंबर :
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता.
या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ रुपये इतकी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केली.
